पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक २५ मार्च २०२४ रोजी आयोजित पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या मेळाव्याचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, पालक प्रतिनिधी दशरथ सांगोलकर आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
दरम्यान पालक प्रतिनिधी दशरथ सांगोलकर यांचे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दरम्यान सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी विभागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा उपस्थितीत पालकांसमोर सादर केला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी उपस्थित पालकांसमोर मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या पाल्याचा पालकांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.