करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा नेत्या रश्मीताई बागल यांच्या समर्थकांची बैठक त्यांच्या निवासस्थानी पार पडली.यावेळी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर होते.
यावेळी बोलताना भाजप नेत्या रश्मीताई बागल म्हणाल्या की माढा लोकसभा मतदारसंघातून विशेषता करमाळा तालुक्यातून आम्ही सर्व महायुतीचे नेते, कार्यकर्ते, एकत्र येऊन मोठ्या मताधिक्याने करमाळा तालुक्यातून लीड देणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने भारत हा प्रगतशील देश बनला आहे त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रश्न विशेषता करमाळा तालुक्यातील पाणी प्रश्न रेल्वे, रस्ते हे विषय मार्गी लागलं आहे.
यावेळी प्रिन्स उर्फ दिग्विजय बागल, मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर,आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजीराव बंडगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप,आदिनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नानासाहेब लोकरे,जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार , जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे,भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, बाळासाहेब कुंभार, किरण बोकन , रेणुका राऊत , याबरोबरच मकाई कारखान्याचे संचालक रेवणनाथ निकत, बाळासाहेब अनारसे , युवराज रोकडे बापूराव चोरमले, रामभाऊ हाके, अजित झांझुर्णे, सचिन पिसाळ, कुलदीप पाटील, सतीश निळ, माजी संचालक गोकुळबापू नलवडे, गोरखआप्पा जगदाळे, मोहनराव गुळवे, बापूराव कदम, व किरण बोकण, काकासाहेब सरडे, जितेश कटारिया, दीपक चव्हाण, सुहास घोलप, शशिकांत पवार, लक्ष्मण केकान, नितीन झिंजाडे, नरेंद्र ठाकूर, अफसर जाधव, संतोष कुलकर्णी, अमोल पवार , जयकुमार कांबळे,पूजा माने, ॲड जयदीप देवकर, ॲड नानासाहेब शिंदे, ॲड सोनावणे, काशिनाथ काकडे,लक्ष्मण महाडिक, केरुजी गव्हाणे, व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.