पंढरपूर प्रतिनिधी
विरोधकांनी या पोस्टवर जळून आपल्या नीच वृत्तीचे दर्शन घडवू नये . तो वेळ आपण आपल्या आपल्या उमेदवारांची " चमचेगीरी ]" करण्यात आणि काय " गबाळ मिळते " का यात डोके चालवणेत घालवावा .एक सामान्य नागरिक म्हणून मी या सर्वसामान्य उमेदवाराचे स्वागत करीत आहे . आणि या गरीब आणि सद्गुणी नेत्याला शुभेच्छा देत आहे ! निवडून तर हे येणारच यात शंका नाही . श्रीमंत परिवार वाद्यांच्या " सतरंजी उचल्यांनी " कितीही अक्कल पाजळली तरी ही .
- मुरलेंद्र शेटे
राम सातपूते यांच्या पोस्टवरून
माझे वडील माळशिरसच्या एका साखर कारखान्यात एक ऊसतोड मजूर म्हणून काम करायचे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी मला कधीच काही कमी पडू दिलं नाही! कायम लढण्याची प्रेरणा दिली, इतरांना मदत करण्याची शिकवण दिली. एक सामान्य ऊसतोड मजूर असलेले माझे वडील माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिले! आज त्याच माळशिरस मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना मागे वळून जेव्हा मी बघतो, तेव्हा त्या प्रत्येक संघर्षात मला माझे वडील दिसतात!
आमदार झाल्यावर जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा ते जास्त काही बोलले नाही, मोजकंच बोलले पण खूप समर्पक बोलले!
"पोरा, जुने दिस विसरू नको, मिळालेल्या संधीचं सोनं कर, लोकांची सेवा कर आणि कायम जमिनीवर रहा!"
माझ्या अडाणी ऊसतोड मजूर वडिलांनी दिलेला हा संस्कार जपण्याचा मी कायम प्रयत्न करतोय!
- राम सातपुते .