आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ . भूमिकाताई बेरगळ यांचे पती परमेश्वर , आटपाडी तालुक्यातल्या वैद्यकीय क्षेत्राबरोबरच अनेक क्षेत्रात कार्यरत राहीलेले दिवंगत डॉ . प्रतापसिंह बेरगळ यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शेकडोंनी बेरगळवाडी येथे जावून त्यांच्या पवित्र आत्म्यास अभिवादन केले .
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ . प्रतापसिंह बेरगळ यांनी वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर आटपाडी तालुक्यातल्या बेरगळवाडी, बनपूरी, करगणी इत्यादी गावातल्या जनतेच्या वैद्यकीय सेवेत स्वतः सह डॉक्टर पत्नीला समर्पित केले . गत दोन दशकात हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करीत या दांम्पत्याने इतर क्षेत्रातही आपल्या लोकाभिमुख कार्याद्वारे प्रचंड लोकसंग्रह संपादन केला . सर्वस्पर्शी, सर्वप्रिय, सर्वमान्य, सर्वोत्तम असे स्वच्छ पारदर्शक पाण्यासारखे या दांम्पत्याने काम केल्यानेच डॉ . भूमिकाताई बेरगळ प्रचंड मताधिक्क्याने विजयी होत पंचायत समितीच्या सभापती पदावर विराजमान झाल्या होत्या . या दांम्पत्यांच्या लक्षवेधी आणि चौफेर कार्याला निष्ठूर नियतीने घातलेल्या घाल्याने डॉ . प्रतापसिंह बेरगळ यांना जीवनाचा डाव अर्धवट सोडून या जगाचा निरोप घ्यावा लागला होता . गत वर्षामध्ये त्यांच्या धर्मपत्नी डॉ . भूमिकाताई बेरगळ यांनी डॉक्टरांच्या नावाने संस्था स्थापन करून विविध लोकाभिमुख कार्याची सुरुवात केली . अनेक उपक्रम राबवित संस्थेची दमदार वाटचाल करणाऱ्या डॉ . भूमिकाताई बेरगळ यांनी तालुक्याच्या दुर्गम, लांब आणि वाहतूकीची पुरेशी साधने नसणाऱ्या भागातल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, ड्रायव्हर, डिझेल आणि मेंटेनन्स यांचाच फक्त खर्च निघावा एवढ्या माफक नाममात्र दरात अर्थात ना नफा ना तोटा या तत्वावर ही रुग्णवाहीका सर्वांना उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रुग्णवाहीकेची सोय करण्याचा केलेला संकल्प आज त्यांनी पूर्णत्वास नेला .
अत्याधुनिक साधनांची सोय असणाऱ्या काही लाखाच्या या रुग्णवाहीकेला डॉ . प्रतापसिंह बेरगळ यांच्या मातोश्री, आपल्या सासूबाई सुशिला रामचंद्र बेरगळ यांच्या हस्ते पुजन करून ही रुग्नवाहीका लोकार्पण करीत डॉ . भूमिकाताईं बेरगळ यांनी शब्दपुर्ती केली आहे .
यावेळी घेतल्या गेलेल्या रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरात ४७ लोकांनी रक्तदान केले. १२० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात ९ रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून २५ रुग्णांना चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. घरनिकी गणामधील प्रत्येक गावांमध्ये दर महिन्याला मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्याचा संकल्प डॉ . प्रतापसिंह बेरगळ सामाजीक संस्थेच्या संस्थापक,अध्यक्षा डॉ. भूमिकाताई बेरगळ यांनी बोलून दाखविला.
स्मृतिदिना निमित्त यावेळी सांगली जि . प . चे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, माजी उपसभापती तानाजी यमगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, दै . प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके ,पं . स . माजी सदस्य दादासाहेब मरगळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष सुरज पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस नितीन डांगे, घरनिकीचे माजी सरपंच विक्रम दाईगडे, करगणीचे माजी सरपंच गणेश खंदारे, माजी उपसभापती प्रा . साहेबराव चवरे, झरेचे माजी सरपंच भगवानराव पाटील, भीमाशंकर स्वामी झरे, बनपुरीचे सरपंच दीपक देशमुख, विकास पुकळे बनपूरी, म्हाळुंग पं .स .चे माजी सदस्य अनिलदादा जाधव, राजू आप्पा काळेल म्हाळुंग , पंढरपूरचे शिवाजी कंड्रे, भागवत शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष पवनकुमार बेरगळ, सचिव डॉ. आप्पासाहेब पाटील, सदस्य घनश्याम बेरगळ, सौ . वैशाली संतोष रूपनर, दीक्षा बेरगळ, चंद्रकांत झंजे, बंडूशेठ कातुरे, निलेश सूर्यवंशी, प्रमोद पवार, जितेंद्र जाधव, शशिकांत जाधव, विनोद खांडेकर, निलेश गुरव, बापूराव पवार, दादासो पवार, संतोष पवार, बाळू केरबा मेटकरी, रुषीकेश पाटील कामथ इत्यादी अनेक मान्यवर, ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक उपस्थित होते.