सात पैकी सहा कलाप्रकार सिंहगड करंडक च्या अंतिम फेरीत दाखल
सोलापूर प्रतिनिधी
पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट च्या वतीने सिंहगड करंडक ही अत्यंत दिमाखदार व चुरशीच्या सांस्कृतिक कलाप्रकारांच्या स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात या वर्षी दिनांक ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सिंहगड इन्स्टिट्यूट च्या कोंढवा कॅम्पस येथे पार पडलेल्या स्पर्धेत सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर केगांव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिंहगड करंडकच्या प्राथमिक फेरीमध्ये ७ कलाप्रकारापैकी ६ कलाप्रकारामध्ये यश संपादित केले. यामध्ये समूहगीत, समुहनृत्य, फॅशन शो, पथनाट्य, मिस्टर अँड मिस सिंहगड, एकल नृत्य या कलाप्रकारात यश संपादित केले. वरील सर्व कलाप्रकार अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
या सर्व कलाप्रकारांसाठी प्रशिक्षक सुदर्शन माने,अंकुश वाघमारे, विश्वजीत माने, नाजीया पटेल, स्वप्नजा आराध्ये, चैताली मराठे, वसीम शेख सर, सागर भजनावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले,उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे,इस्टेट ऑफिसर डॉ. दत्तात्रय नवले,सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्य निखत शेख, सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूरच्या प्राचार्य चैताली मराठे,प्रा.शशिकांत हिप्परगी यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना सिंहगड करंडक स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.