पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहर सोशल मिडिया अध्यक्ष पदी महेश जाधव यांची निवड करण्यात आली असून सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस( आय) मा.उपाध्यक्षा सौ. सुनेत्राताई पवार व सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष सचिन खैरे पाटील यांचे शुभहस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आली. यावेळी रुक्मिणी परिवाराच्या वतीनेही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुनेत्राताई पवार म्हणाल्या की सर्वांनी मतभेद विसरून एकत्रितपणे पक्ष वाढीसाठी काम करण्याचे आवाहन करून सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय प्रक्रिया व पक्षाची धोरणे या आँनलाईनच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवुन जनतेशी संवाद साधण्यास सांगितले व याचा वापर पक्ष वाढीसाठी जास्तीत जास्त करण्याचे सांगितले.
यावेळी पंढरपूर शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस किशोर जाधव, सेवादल शहराध्यक्ष गणेश माने, शहर उपाध्यक्ष सागर कदम, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शकिल रत्नपारखी,लोकसभा माढा समन्वयक अजय अदाटे, व गायकवाड हे सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.