कडेगाव प्रतिनिधी
कडेगाव जि. सांगली येथे आज दिनांक 15/2/2024 रोजी समस्त ओबीसी बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाद्वारे राज्य सरकारने काढलेल्या जाचक अध्यादेशाचा जाहिर निषेध करण्यात आला. तसेच कडेगाव येथील महादेव मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत हा भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाद्वारे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कडेगाव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कडेगाव मधील समस्त ओबीसी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.