पंढरपूर प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत आहे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्व सामान्यजनते पर्यंत पोहोचवावी यासाठी गाव चलो अभियान सुरू करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर येथे भाजपा पंढरपूर दक्षिण मंडलाच्या वतीने गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेस माढा लोकसभा निवडणुक प्रमुख मा. आ. प्रशांत परिचारक , माढा लोकसभा समन्वयक राजकुमार नाना पाटील , जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार - सावंत , यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस मा.सचिन शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप,गाव चलो अभियान जिल्हा संयोजक लक्ष्मण केंकान,माढा लोकसभा विस्तारक अनंत राऊत ,पंढरपूर मंडल अध्यक्ष भास्कर कसगावडे, विधानसभा विस्तारक वारपे ,सर्व सुपर वॉरियर्स ,गाव चलो अभियान प्रवास कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.