भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. नवले उपस्थित होते.
यावेळी भाळवणी ग्रामस्थांच्या वतीने सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांचा सत्कार सरपंच रणजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.नवले म्हणाले की मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाची कमतरता होती. पण सध्या सरकारच्या वतीने सर्व औषधांची पूर्तता केली असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा पुरवठा मागणीप्रमाणे केला जाईल. आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णाशी व नेतेमंडळीशी सुसंवाद साधला पाहिजे. आरोग्य केंद्रातील स्वच्छतेबाबत काळजी घेतली पाहिजे. आरोग्य केंद्रात आवश्यक असणारे लसीचा साठाही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. रुग्णास कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारी लस हि उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रुग्णांनी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. असेही आव्हान यावेळी डॉ. नवले यांनी केले.
यावेळी पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले,डॉ. रेपाळ,डॉ.साळुंखे,सरपंच रणजित जाधव,वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील,रीपाई तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले, रवि शिंगटे,अविंदा गायकवाड प्रकाश माळी,मेटकरी, गंगणे,कांबळे,आवळे आदि मान्यवर उपस्थित होते.