जबलपूर प्रतिनिधी
नवकार वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या श्रद्धा जैन या लोकांना त्यांच्यातील कलागुण ओळखण्यासाठी आणि त्यांच्या जिवनात येणाऱ्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी संस्थेद्वारे असलेल्या नाविन्यपूर्ण कार्याचे नेतृत्व करतील. नवकार वर्ल्ड रेकॉर्ड्सचे सीईओ विनायक अशोक लुनिया म्हणाले की, नवकार वर्ल्ड रेकॉर्ड्स ही जागतिक स्तरावरील पहिली संस्था आहे जी केवळ तांत्रिकदृष्ट्या एखाद्या व्यक्तीची प्रतिभा ओळखून त्या प्रतिभेच्या आधारे त्याच्या कलागुणांना प्रोत्साहन देते.
चेअरपर्सन श्रद्धा जैन यांच्या नेतृत्वाखाली, संस्थेचे ध्येय आहे की जगभरातील कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्याची उन्नती व्हावी. त्याच्यामधील लपलेल्या प्रतिभेचा शोध घेण्यासाठी आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
श्री लुनिया यांनी श्रद्धा जैन यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळवण्याची आणि नवीन उपक्रम राबवण्याची आशा व्यक्त केली. श्रध्दा जैन यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल टीमने त्यांचे अभिनंदन केले आहे. या टीममध्ये संस्थापक अध्यक्ष आणि सीईओ विनायक अशोक लुनिया, सल्लागार समिती सदस्य पद्मश्री डॉ.विजय शहा (राष्ट्रपती प्रमुख दंत चिकित्सक ४० वर्षे),पद्मश्री पंडित स्वपन चौधरी कॅलिफोर्निया (आंतरराष्ट्रीय तबला वादक), पद्मश्री सुश्री तृप्ती मुखर्जी, न्यूझीलंड (यूएसए) पारसी गायक, पद्मश्री डॉ.सोमजी घोष (पारसी गायक), सरचिटणीस ताल सम्राट आदित्य नारायण बॅनर्जी (आंतरराष्ट्रीय तबला वादक) न्यू जर्सी यूएसए, उपाध्यक्ष डॉ.सचिन कासलीवाल उज्जैन, मध्य प्रदेश, डॉ. राजेश फडे पंढरपूर महाराष्ट्र,पंडित रमेश नारायण (संगीतकार व गायक) राष्ट्रीय पुरस्कार धारक, त्रिवेंद्रपुरम केरळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.