पंढरपूर प्रतिनिधी
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड जुनिअर कॉलेज गादेगाव बारावीच्या विद्यार्थ्यांनचा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
बारावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता .यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे महेश साठे ,वैद्यकीय अधिकारी डॉ.विजयकुमार सरडे आदी उपस्थित होते विद्यार्थी जीवनामध्ये बारावी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे असे मत महेश साठे यांनी व्यक्त केली. मेडिकल क्षेत्र विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूप चांगले असल्याचे मत डॉक्टर सरडे यांनी व्यक्त केले .यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीवर सखोल मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी विद्यालयाची प्रगती व विद्यालयात राबविले जाणारे उपक्रम याविषयी माहिती आपल्या मनोगत मध्ये दिली .कार्यक्रम साठी अनिल आप्पा बागल, रमेश बागल,संजय शेडगे, ब्रह्मदेव कदम,सहशिक्षक संतोष पवार ,राजेंद्र भोसले ,दीपक देशमुख नियाज मुलाणी,सोमनाथ भुईटे , नागेश कांबळे, वर्षा मोरे, शितल बागल, लीना बागल, शीतल मस्के, मसरुद्दीन पटेल, अजय मोरे ,सीमा रकटे, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.