सातारा प्रतिनिधी
कै.के बी मोरे मोफत वाचनालय पेठ शिवापूर या वाचनालयाचे नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आले.
त्याप्रसंगी सातारा जिल्हा ग्रंथालयाचे निरीक्षक साठे सर व पुणे जिल्हा ग्रंथालयाचे सदस्य व मार्गदर्शक संजय इंगवले , संजय हिरवे, श्रीमती शालन मोरे, नथुराम साळुंखे व वाचनालयाचे अध्यक्ष सर्व सदस्य महिला सदस्य ग्रंथपाल, माजी ग्रंथपाल व मोरणा विभागातील सर्व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी इमारतीची व सुसज्ज फर्निचर सह नवीन जागेची फीत साठे सर, व संजय इंगवले यांनी कापून शुभारंभ करण्यात आला .
श्री सत्यनारायण पूजा ,महाप्रसाद, वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सर्वांचे आभार मानले.श्री शशिकांत प्रभाळे, बापू फुटाणे प्रदीप हिरवे, गजानन मोहोळकर मोहन माने नामदेव साळी कुलदीप हिरवे सौ प्रियांका हिरवे सौ उर्मिला हिरवे कविता हिरवे सौ सुनीता हिरवे प्रार्थना निलेश हिरवे श्री व सौ अवसरे व अनेक स्थानिक ग्रामस्थ, वाचक ,सभासद, उपस्थित होते.