सोलापूर प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीची मोहोळ तालुका बेगमपूर येथे बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार होते या बैठकीत
पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या अनेक वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.
या बैठकित पत्रकार सुरक्षा समिती मोहोळ तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली चे मोहोळ तालुका मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर सचिव शहाजी शिंदे खजिनदार सागर पवार कार्याध्यक्ष भास्कर भोई संघटक डॉ गणेश पडसाळ कर प्रसिद्धी प्रमुख अजय तोडकर यांची निवड जाहीर करण्यात आली पत्रकार सुरक्षा समिती चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी यांचा शाल ओळख पत्र व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सरवदे ज्ञानेश्वर गवळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद उपस्थित होते.