मायणी प्रतिनिधी विशाल चव्हाण
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मायणी येथे चालू असलेल्या घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनासाठी 63 लाखाहून अधिक बजेट मंजूर झाले असून घनकचरा साठपा प्रक्रियेचे काम अनफळे रस्त्या जवळ बांधकाम चालू असून, या कामामध्ये मोठ्या प्रमाणात कच्या विटांनी बांधकाम केले असून अतिशय निष्कृष्ट दर्जाचे काम चालू आहे.
याकडे प्रशासन अधिकारी कोणीही लक्ष देत नसून 63 लाख रुपये निधी बांधकामामध्ये मातीमोल होणार असल्याचे दिसते .63 लाख रुपये निधी मंजूर करून माणसांच्या डोळ्यात माती घालण्याचे काम अनेक जण करत असून .ठेकेदारांना अभय देऊन शासकीय पैसे लुटण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे असे नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी शिवसैनिकांशी संपर्क केला व हे काम चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा असे नागरिकांनी सांगताच शिवसैनिक व पदाधिकारी कामाच्या ठिकाणी जाऊन मायणी ग्रामसेवक प्रशासकीय अधिकारी ,कोळी अण्णा यांना बोलवून घेतले व जोपर्यंत बांधकामा मधील विटांचे निरीक्षण होणार नाही तेवढे दिवस हे काम बंद करण्यास मायणी शिवसेना अध्यक्ष फिरोज भाई मुलाणी व शिवसैनिकानि सांगितले.