पंढरपूर प्रतिनिधी
होळकर वाडा, पंढरपूर, जि-सोलापूर येथे राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्हा युवक आघाडीची आढाव बैठक व पदनियुक्ती सोहळा महाराष्ट्राचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी बैठकीच्या सुरुवातीला राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त फोटो पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी खालील प्रमाणे युवक आघाडीच्या नियुक्ती करण्यात आल्या.
१) दामाजी प्रकाश मिटकरी- सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष (सोलापूर विभाग)
२) संतोष धोंडीराम मासाळ- सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष (पंढरपूर विभाग)
३) शिवाजी अर्जुन शेंडगे- सोलापूर युवक जिल्हा सचिव (पंढरपूर विभाग)
४) दिनेश सातपुते- सोलापूर युवक जिल्हा उपाध्यक्ष (सोलापूर विभाग)
५) तातोबा गरंडे- सोलापूर युवक जिल्हा सचिव (सोलापूर विभाग)
६) समाधान नवनाथ जाधव- पंढरपूर युवक तालुकाध्यक्ष
७) संजय भागवत गाढवे- मोहोळ युवक तालुकाध्यक्ष
८) संजय बंडगर- उत्तर सोलापूर युवक तालुकाध्यक्ष
९) रविराज शेंडगे- माळशिरस युवक तालुकाध्यक्ष
१०) वैभव दत्तात्रय गडदे- मंगळवेढा युवक तालुकाध्यक्ष
११) पप्पू तुकाराम सलगर- मंगळवेढा युवक तालुका उपाध्यक्ष
१२) वैभव उर्फ नामदेव महादेव काशीद- मंगळवेढा युवक तालुका संघटक
१३) लखन संपत साळुंखे- मंगळवेढा युवक तालुका कार्याध्यक्ष
१४) नागेश शिंदे- सोलापूर युवक शहराध्यक्ष
आदी युवकांना नियुक्ती देऊन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील जे पदाधिकारी बैठकीला अनुपस्थित होते. त्या सर्वांना आजच्या बैठकीत पदमुक्त करण्यात आले असून येणाऱ्या आठ दिवसांमध्ये दोन्ही जिल्हाध्यक्षांनी आपआपल्या विभागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन बैठका घेऊन २१ लोकांची जिल्हा व तालुका कार्यकारणी पूर्ण करून आठ दिवसाच्या आत लेखी स्वरुपात कळविण्याचे आदेश देण्यात आले.
मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी बाळराजे लवटे यांचीही नियुक्ती करण्यात आली. त्यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे युवक आघाडी उपाध्यक्ष धीरज पाटील, विद्यार्थ्यां आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पंकज देवकाते, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन मेटकरी, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी, सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष म्हाळप्पा खांडेकर, सातारा जिल्ह्याचे नेते बाळासाहेब डोंगरे यांच्या सहित युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.