मोहोळ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील, मुख्यमंत्री अनाथांचे नाथ, मा. एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथे मूकबधिर शाळेत खाऊ वाटप आणि मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते मुख्यमंत्री यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे , सह संपर्क प्रमुख, मा. दादासाहेब पवार, उपजिल्हा प्रमुख मा. दादासाहेब करणावर, तालुका प्रमुख मा. सचिन सुरवसे, तालुका समन्वयक भाऊ कदम,महिला आघाडी शहर प्रमुख मा. मुक्ता ताई खंदारे, उपशहर प्रमुख अजीज भाई इनामदार, आमोल चवरे , आण्णा माने, सिदेश्वर चवरे, लखन पवार प्रशालेचे मुख्याध्यापक मा.शेटे सर व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
मोहोळ तेथे मूकबधिर शाळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे अनाथांचे नाथ आहेत म्हणून आम्ही मोहोळ तालुक्यातील शिवसेनिकांनी मूकबधिर शाळे मध्ये मुलांच्या हातून केक कापून साहेबांचा वाढदिवस साजरा केला त्या मुलांना चरणराज चवरे यांच्या कडून मुख्यमंत्री यांच्या वतीने ड्रेस देणार आहोत.
शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चवरे