पंढरपूर प्रतिनिधी
एमआयटी जुनियर कॉलेज वाखरी येथे "विश्वंभर 2024" उत्साहात संपन्न झाला .एमआयटी संस्थेचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर येथे विश्वंभर 2024 स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले .
एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या अकॅडमीक हेड ज्योती जोटवाणी ,अकॅडमीक कोऑर्डिनेटर अमोल ओव्हाळ ,एच आर प्रीती , एक्झाम हेड ओंकार देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रजनन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरपूर एमआयटी चे प्राचार्य सरदा रेड्डी यांनी केले कार्यक्रमांमध्ये एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनेक आकर्षक गुणदर्शनात्मक कार्यक्रमातून उपस्थितांचे मन वेधून घेतले.
या कार्यक्रमास पंढरपूर परिसर व तालुक्यातील विशेष प्रमुख पाहुणे म्हणून सर्व कॉलेजचे प्राचार्य , पत्रकार बंधू, शिक्षक, पालक ,विद्यार्थी उपस्थित होते तसेच चिचोंली एम आय टी प्राचार्य बालाजी घुगे, बार्शी एमआयटीचे प्राचार्य राजकुमार गायकवाड ,प्राचार्य रेखा पाटील, सोलापूर एमआयटीचे प्राचार्य स्वप्निल शेठ ,प्राचार्य पुराणिक सर, सांगली एमआयटीचे प्राचार्य वेंकट सर ,प्राचार्य नितीन सर, तळेगाव एमआयटीचे प्राचार्य चौधरी सर ,आळंदी एम आय टी चे प्राचार्य सदाशिव कुंभार सर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेतले.