बेळगाव प्रतिनिधी
श्री नामदेव दैवकी संस्थेच्या वतिने २१ वा वधुवर परिचय मेळावा शनिवार दि १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ पासुन भरणार आहे.बेळगांव चा वधुवर मेळावा हा गोवा, कोकण,उत्तर कर्नाटक,म्हैसुर,बेंगलोर, दक्षिण महाराष्ट्र,विजापुर, सोलापुर,पुणे,मुंब्ई पर्यतच्या समाज बांधवान साठी उपयुक्त ठरतो आहे.ह्या वर्षी मेळावा भव्यपणे यशस्वी करण्यासाठी काम सुरू झाले आहे.
तरी आपणास सर्वांना विनंती आहे की सोबत दिलेली निमंत्रण/कार्यक्रम पत्रिका आपल्या संपर्कातील समाज बांधव ,पाहुण्यांपर्यंत व्हॅाट्सअप /फेसबुक द्वारे गृपवर, परगावाला पाठवून मेळाव्याचा प्रसार आणि प्रचार केल्या मुळे समाजाबांधवांना सहभागी होता येईल.
तरी सर्व कार्यकर्ते ,समाजबांधव भगिनींनी हा मेळावा भव्यपणे यशस्वी होण्यासाठी आपले अनमोल सहकार्य करावे आणि सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष अजित कोकणे सचिव शशिकांत हावळ चेअरमन अमर कोपर्डे यांनी केले आहे.