नवी मुंबई प्रतिनिधी सुचित्रा कुंचमवार
डिव्हीजण डे चे औचित्य साधून शाहिद तुकाराम ओंबळे सभागृह सेक्टर १८ नेरूळ नवी मुंबई येथे नागरी संरक्षण दल (महाराष्ट्र शासन) मधील नवनिर्वाचित उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री. करमबीर सिंग भुर्जी यांचा सत्कार सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आला.
या प्रसंगी सह उपनियांत्रक श्री. अनिल गावित सर त्यांच्या समावेत विभागीय क्षेत्ररक्षक सौ. सुवर्णाताई हाडोळे आणि सर्व पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.या वेळी सदस्यांनी त्यांचे मनोगत मांडले व मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. पाठ्यक्रम १३ मधील सर्व सदस्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र यांचे वाटप करण्यात आले तसेच जयश्री फाऊंडेशन आणि अपोलो रुग्णालय यांच्या सहयोगाने बेलापूर डिव्हीजन ला प्रथमोपचार पेटी देण्यात आली. या कार्यक्रमाला तरुणांचा आणि महिलांचा विशेष सहभाग पाहायला भेटला.
नागरी संरक्षण दलातील सर्व पाठ्यक्रम मधील सदस्य सतत कार्यरत असतात नागरिकांसाठी जनजागृती करताना वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जातात आणि सगळ्यांनी आपातकालीन परिस्थितीत गरजूंना कशी मदत करावी या साठी चे उजळणी धडे घेतले जातात व प्रात्यक्षिके करून दाखविले जातात.