पंढरपूर प्रतिनिधी
दि.17 जाने.2024 रोजी जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पळशी गावचे कर्तव्यदक्ष पोलिस पाटील प्रा.अशोक लोखंडे पाटील बोलत होते.
प्रा. लोखंडे पाटील पुढे म्हणाले की वाढदिवस आज काल फार विचित्र पद्धतीने साजरे होतात.परंतु ज्यांच्यावर नैतिकता व चारित्र्याचे बाळकडू पाजून जडण घडण केलेल्या व्यक्तिमत्त्व अवघ्या भारतभर ज्यांच्या नावाचा उल्लेख अदबीने केला जातो अशा आबासाहेब यांचे सद्गुण घेऊन सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी तयार केलेली अनमोल पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेलं रत्न म्हणजे डॉ.बाबासाहेब देशमुख होय.
पैशाचा विनियोग कसा,कोणत्या विधायक कार्यक्रम करण्यासाठी करावा लागेल हे ज्यांना जमते त्यांना जीवनाचे गणित जमते. आजकालचे विद्यार्थी मोबाईलच्या युगात वावरत असताना त्यांचेवर नैतिक मूल्यांची व संस्काराची जडण घडण होणे गरजेचे आहे.त्यासाठीच शाळेत मूल्य शिक्षण दिले गेले पाहिजे असे म्हणून डॉ.बाबासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पळशी विकास सोसायटीचे मा. चेअरमन दिलीप माने होते.प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रा. विष्णुपंत सुरवसे सर यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाच्या अध्यक्ष ,प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करून डॉ बाबासाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बिराजी शिंदे,विजय तरटे,सागर तरटे,गणेश गुरव,दत्ता सुरवसे,अतुल सूरवसे,धोंडीराम तरटे,संस्थेच्या सचिव प्रा.राणी वि. सुरवसे मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमासाठी शेख मॅडम, नौसार मुलाणी सर यांनी विशेष परिश्रम घेतले.