सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका भारती पाटील होत्या. प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रिया भारत , लक्ष केंगार, प्रेम शिरगण, विजय झिपटे,श्रद्धा भिसे या विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितले. भारती पाटील म्हणाले ,नेताजी सुभाषचंद्र बोस हे बालपणापासून हुशार, बुद्धीमान होते.धाडसीवृती असल्याने प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी घेत.युवकांचे श्रद्धास्थान बनले.आझाद हिंद सेनेचे सरसेनापती बनले.देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महत्वपूर्ण योगदान लाभले असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर पाटील यांनी केले तर जगदेव गवसने यांनी आभार मांनले.