- नऊ क्रीडा प्रकारात रंगणार स्पर्धा
सोलापूर प्रतिनिधी
एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने 'इंथूजिया २ के २४'वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज बुधवारी सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले , प्राचार्य डॉ.शंकर नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धा भरवत असते. दरम्यान, यंदाच्या वर्षी २३ ते २५ जानेवारी दरम्यान एनुअल स्पोर्ट्स ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून महाविद्यालयातील क्रीडा स्पर्धेने उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी स्पोर्ट्स कोऑडनेटर डॉ.करीम मुजावर, उपप्राचार्य डॉ.शेखर जगदे व डॉ.रवींद्र व्यवहारे, जनरल सेक्रेटरी सागर करमल, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्य निखत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, इस्टेट मॅनेजर डॉ.दत्तात्रय नवले आदी उपस्थित होते.
या क्रीडा प्रकारात होतेय स्पर्धा सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात परिसरातील मैदान आणि विविध क्लास रूम मध्ये या स्पर्धा सुरू आहेत. क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, खो-खो, टेबल टेनिस, कॅरम, ऍथलेटिक्स, चेस या नऊ क्रीडा प्रकारात स्पर्धा सुरू आहे.