भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सरपंच पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे सरपंच राजकुमार पाटील यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाची आज निवड होत आहे.या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे सर्वसाधारण आहे.
गावाची पूर्वीपासून परंपरा चालत आली आहे. ज्या दिवशी निवडणूक होते त्याच दिवशी संध्याकाळी सर्वजण एकत्र येऊन चहापाणी करतात आणि गावच्या विकास कामाकरिता एकमेकांच्या सहकार्याने विविध योजना राबवल्या जातात. गावाच्या राजकारणात कोणत्याही समाजाचा भेदभाव केला जात नाही हीच परंपरा कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदाचा उमेदवार योग्य तो निवडला जाईल अशी अपेक्षा ग्रामस्थांच्याकडून केली जात आहे.