ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्हा यांचे वतीने कै.अर्जुन कचरू पा गायकर पंचवार्षीक पुस्तक स्पर्धा ( सन २०१९ ते २०२३ पर्यंत स्पर्धा कालावधी) आयोजीत करण्यात आली आहे. ही माहिती आयोजक तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनाथ पाटिल गायकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
कथा,कांदबरी,कविता,ललित, समिक्षा, पर्यटन आदीसह सर्वच प्रकारातील प्रकाशित पुस्तकांसाठी (एकुण पाच प्रकारात) ही स्पर्धा आहे.
पुस्तके श्री.नवनाथ अर्जुन पा गायकर, रा.आहुर्ली, पो.सांजेगाव, ता.ईगतपुरी, जि.नाशिक ४२२४०२ या पत्त्यावर किमान तीन प्रतीत फोटो व अल्पपरिचयासह फेब्रुवारी २०२४ चे आत पाठवावी.स्पर्धा सहभाग शुल्क रुपये १०० (शंभर रुपये) आहे.
आधिक माहिती साठी मो.नं. ९८८१३२९७०९ किंवा ९७६३८२७७०८ यावर संपर्क साधावा असे आवाहन गायकर यांनी केले आहे.