सोलापूर प्रतिनिधी
विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेत स्काऊट गाईड चळवळीच्या खरी कमाई उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला.
प्रथम स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन नेताजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवीशंकर कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माता पालक सदस्य शीतल पवार, आकाशवाणीच्या निवेदिता कविता वाघमारे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे उपस्थित होते.
या बाल आनंद मेळाव्यात ऐंशी स्टॉल उभारण्यात आले होते. सुशीला, भेळ, कचोरी, शाबूत वडा,वडापाव, सँडविच, ढोकळा, पावभाजी, कोबी मंचुरियन, नूडल्स, संगम वडा, मसाला पापड, कडक पोहे, आप्पे,मोदक, शेंगा लाडू, सुगंधी दूध,शरबत, चहा असे विविध पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करुन विक्री केली.या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सहा ते सात हजार रुपये गुंतवणूक केले होते.यामधून चार हजार रुपयांचा फायदा झाला.या मेळाव्यात विद्यार्थी हेच मालक व ग्राहक बनले होते.
विद्यार्थ्यांना खरी कमाईचे महत्व लक्षात यावे.उद्योग,धंदा,दैनदिन व्यवहार ,खरेदी-विक्री, नफा- तोटा यासंबंधीची माहिती व्हावी यासाठी बाल आनंद मेळावा घेतल्याचे मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी सांगितले. आकाशवाणीच्या निवेदिका वाघमारे म्हणाले, शाळेने विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाची ओळख करुन दिली.कामाचा अनुभव करुन दिले.मेहनतीने पैसे कसे कमवायचे.कष्टाची कमाई खरी कशी असते याबाबत मार्गदर्शन केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी स्काऊट गाईड प्रमुख हणमंत कुरे, श्रेयस बिराजदार,बजरंग शिरसाट, अमोल गुड्डेवाडी,किरण साळुंखे महेंद्र वाघमारे रविकांत पोतदार, सुजाता फुलारी, शितल चमके उज्वला भांड, सचिन होटगे आदींनी परिश्रम घेतले.