वाखरी येथील अनुलोमचे वस्तिमित्र जितेंद्र दिगंबर पोरे यांना ही उपमुख्यमंत्री फडणवीस यांचाकडून मिळाली पंचधातूची श्रीराम मूर्ती
पंढरपूर प्रतिनिधी
अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोम ही सामाजिक संस्था २०१६ पासून सामाजिक कार्य करीत आहे,शासकीय योजनांना जनसहभागाची साथ असे ब्रीद वाक्य घेऊन कार्य करणारी संस्था, गाळमुक्त शिवार, गाळमुक्त तलाव या योजनेतून गाळ काढून तो शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी दिला अनेक शासकीय योजनांचा पाठपुरावा करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिले जातात,शासकीय अधिकारी कामात चालढकल करीत असतील तर त्यांना कामे मार्गी लावण्यासाठी योग्य त्या सूचना अनुलोम देत असते अश्या या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्व अनुलोमच्या वस्तीमित्रांना अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीराम यांच्या पंचधातूच्या मूर्तीचे वितरण करण्यात आले.
जिल्हा सोलापूर तालुका पंढरपूर गाव वाखरी येथील अनुलोमचे वस्तिमित्र जितेंद्र दिगंबर पोरे यांना ही पंचधातूची मूर्ती मिळाल्याने मंगळवार दि.१६.१.२०२४ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता वाखरी येथील श्रीराम मंदिरापासून सवाद्य मिरवणूक वाखरीचे ग्रामदैवत जगद्गुरु श्री लक्ष्मणदास महाराज यांच्या मंदिरापासून घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. पंढरपूर मंगळवेढा अनुलोमचे भागसेवक श्री रामेश्वर कोरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
घरी प्रतिमेची स्थापना करून महाप्रसाद वाटप करून मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना करण्यात आली.