कायदेविषयक ज्ञान घेतलेली विध्यार्थ्यांची पिढी उद्याच्या भारताचे भविष्य उज्ज्वल करेल..: एन.एम बुद्रुक,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर;पंढरपूर
पंढरपूर प्रतिनिधी
सनराईज पब्लिक स्कूल,शेळवे येथे आज तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक "विधी साक्षरता" शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सह.दिवाणी न्यायालय,पंढरपूर चे वरिष्ठ न्यायाधीश श्री.एन,एम बुद्रुक उपस्थित होते, विध्यार्थ्यांना कायदेविषयक बाबींविषयी मार्गदर्शन करत असताना त्यांनी स्त्री-भ्रूण हत्या संबंधित कायदा, बाल लैंगिक संरक्षण कायदा,परिवहन विषयक कायदे,बाल विवाह संबंधित कायदा अशी विविध कायदेविषयक माहिती विध्यार्थ्यांना दिली,आपल्या भारत देशात कायदा आणि सुव्यवस्था या दोन्ही बाजूंना अत्यंत महत्व आहे,अगदी विध्यार्थी दशेपासून कायद्याचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याला का असावे हे त्यांनी आपल्या ओघवत्या मार्गदर्शनातून पटवून सांगितले..
कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड.अर्जुन पाटील,सचिव ऍड.राहुल बोडके व उपाध्यक्ष ऍड. शशिकांत घाडगे,ऍड. शिवराज पाटील, ऍड. संतोष नाईकनवरे,ऍड. राहुल भोसले, ऍड. सागर गायकवाड, ऍड. सागर गाजरे ई.उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.अर्जुन पाटील यांनी केले तर कार्यक्रमाची रूपरेषा ऍड.राहुल बोडके यांनी स्पष्ट केली तर कार्यक्रमाचे आभार ऍड.शशिकांत घाडगे यांनी मानले
प्रशालेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस.टी गाजरे,संस्थापक सचिव अंकुश गाजरे, व संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा आदर सत्कार करून चांगल्या व विध्यार्थी उपयोगी उपक्रमाबद्दल आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक मोहन गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले..!!