भाळवणी प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने 2023-24 या चालू वर्षी घेण्यात आलेल्या
गांधी संस्कार परीक्षाकरिता न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या आपल्या विद्यालयातील 5 वी ते 12 वी तील एकूण 512 विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचे विभाग प्रमुख म्हणून माने डी एम माने यांनी काम पाहिले.
👉8 वी मधील
कु जाधव श्रावणी बापुसो जिल्ह्यात प्रथम,
👉इ 10 वी मधील
कु. पासले प्रतीक्षा देविदास जिल्ह्यात प्रथम,
👉इ 12 वी मधील
कु.माळवदे प्रीती प्रशांत जिल्ह्यात तृतीय ,
या परीक्षेत वरील विद्यार्थीनींनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. मेडल व प्रमाणपत्र देऊन हा सत्कार समारंभ के बी पी कॉलेज पंढरपूर या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाला गांधी रिसर्च फाउंडेशनचे परीक्षा नियंत्रक गिरीश कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कुलकर्णी म्हणाले की अहिंसक समाज निर्मिती करण्याचा गांधीजींचा उद्देश, राष्ट्रपुरुषांच्या विचारांची साधना, ग्रामोद्योगाला सर्व प्रतिष्ठेला प्राधान्य देणारा समाज निर्माण करण्यासाठी चे संस्कार गांधी संस्कार परीक्षा कसे काम करत आहे यावर प्रकाश टाकला. गांधी फाउंडेशनच्या कार्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे किती मोठे योगदान आहे याचे कौतुक केले. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी व शाळा यांचे अभिनंदन केले आणि आभारही मानले.
कर्मवीर कॉलेजचे प्राचार्य सी.जे.खिलारे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनीही विद्यार्थी व पालक यांना बहुमोल असं मार्गदर्शन करून अभिनंदन केले.
सन 2007 पासून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी यावर्षी 2.5 लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे प्राचार्य एन एम गायकवाड , पर्यवेक्षक रोकडे ,सर्व शिक्षक वृंद, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष संभाजी शिंदे व सदस्य, सर्व पालक वर्ग यांनी केले.