मंगळवेढा प्रतिनिधी
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धापूर येथील श्री.मातृलिंग गणपती यात्रेनिमित्त पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते देवालय गाभाऱ्यात श्री.मातृलिंग गणपतीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला.
अध्यात्मिक व सांप्रदायिक विचारमार्गांचे केंद्रबिंदू व संत विचारांचा अगाध महिमासंपन्न असणाऱ्या पवित्र संतभूमी आपल्या मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील मातृलिंग गणेश यात्रेच्या प्रारंभी आपल्या मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान आवताडे यांनी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह मंदिरात आयोजित केलेल्या श्री गणपती अभिषेक तसेच श्री गणेश पूजेस उपस्थित राहून श्री गजाननाचे भक्तीभावाने दर्शन घेतले व महायज्ञाचेही मनोभावे पूजन करून आपल्यावरील जबाबदारी सार्थ ठरावी यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला. ग्रामपंचायत सिद्धापूर अंतर्गत व ही तर विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री मातुरलिंग देवस्थानच्या भौतिक सोयी-सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने सक्षम आणि वैभवशाली करण्यासाठी आपण भरघोस निधी उपलब्ध करून देऊ असा विश्वास आमदार आवताडे यांनी यावेळी बोलताना दिला.
मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो, मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात, उपस्थित सर्वांना यात्रेच्या भक्तिमय शुभेच्छा देत यात्रेनिमित्त आमदार आवताडे यांनी सर्वांशी हितगुज साधले.
तालुक्यावरील आणि मतदारसंघावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन शेतकरी कष्टकरी यांची पहाट सोनेरी व्हावी याकरिता गणेशांचरणी प्रार्थना केली.
सदर मंगलमय प्रसंगी आमदार आवताडे यांनी तामदर्डी बंधाऱ्याच्या आपल्या गावकऱ्यांच्या मागणीविषयी तात्काळ निधीची उपलब्धतेकरिता प्रयत्नवत आहोत व तात्काळ निधी मिळेल हा विश्वास ग्रामस्थांना देत आपल्या हक्काचे पाणी आपण मिळवून राहू आणि ते टिकवू ही ग्वाही देत आमदार महोदयांनी उपस्थिती मंडळींशी संवाद साधला.
यावेळी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, तसेच युवक नेते प्रणव परिचारक, श्री मातुरलिंग ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील, उपाध्यक्ष कलाप्पा पाटील, माजी संचालक राजन पाटील, माजी सरपंच गणेश गावकरे, माजी मि. संचालक प्रमोद म्हमाणे, सिद्धेश्वर चौगुले सावकार, कृषी उत्त्पन्न बाजार समिती संचालक गंगाधर काकणगी, मि.सरपंच रसूल मुलाणी, सिद्धू कोळी,मल्लू कुंभार आदी मान्यवरांसह ग्रामस्थ आणि भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.