माळशिरस तालुका प्रतिनिधि जयराम घाडगे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. २५ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये गावातील वाघजाई मंदिर, खंडोबा मंदिर, संत सावता माळी मंदिर, जिल्हा परिषद शाळा, स्मशानभूमी परिसर इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. या शिबीराच्या समारोपा दिवशी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.
समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वेळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागव, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह माने-देशमुख, पिसेवाडीचे सरपंच मोहन भाकरे, ग्राम पंचायत सदस्य साहिल आतार, नागेश जानकर, उमेश बनकर, जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक अरूण कोडगार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय माने, शंकरराव माने-देशमुख, ग्रामसेवक सचिन बनकर, रा.स.यो. कार्यक्रम अधिकारी व अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज नांगरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे रा.स.यो. कार्यक्रम अधिकारी एकनाथ बोडके, या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्कृष्ट स्वयंसेवक शंतनू माने-देशमुख, उत्कृष्ट स्वयंसेविका प्रज्ञा जाधव इ. चे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात दिक्षा मदने, मयुरी जाधव, प्रज्ञा मुंगूसकर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या विशेष श्रम संस्कार शिबिरासाठी सचिन बनकर, अर्जून बनकर, गणेश गायकवाड, आण्णा वाघमोडे, सुनिल बनकर, तात्या पिसे, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अंबादास लिंगे, सोमनाथ पिसे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशा गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. पाडुरंग भोसले यांनी मानले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा. दादा साठे, प्रा. डॉ. रविंद्र माने, प्रा. डॉ. बिटू मोलाणे (भोसले), ग्रंथपाल डॉ. वैशाली मोरे, प्रा. अभिजीत घाडगे, प्रा. गोरख मंगवडे, प्रा. डॉ. उर्मिला कोडग तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.