पंढरपूर. प्रतिनिधी
सुप्रसिद्ध कवी, लेखक.व व्याख्याते प्रविण दवणे यांचे व्याख्यान दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ ते ५ मध्ये सिंहगड महाविद्यालय पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. युवकांना दिशा व मनाला नवी उमेद देणारे प्रसन्न व खेळकर हृदयसंवाद साधणारे प्रा. प्रविण दवणे यांचे बुधवार दिनांक १० जानेवारी रोजीचे व्याख्यान सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय व पालवी संस्थेच्या संयुक्त उपक्रमातून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये *"चला तर जगण्याचा आनंद जगतानाच घेऊयात"* या विषयावर आयोजित केले आहे.
पालवी संस्कार सेतु संस्कार- विचार- राष्ट्रनिर्माण आयोजित दीपस्तंभ मनातले, दीपस्तंभ जनातले या विषयावर सुप्रसिद्ध कवी लेखक व व्याख्याते प्रविण दवणे विद्यार्थी, युवक व इतर उपस्थित यांच्याशी संवाद साधणार असुन हे व्याख्यान सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
तरी पंढरपूर व पंढरपूर परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.