सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मिडीयम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते. व्यासपीठवर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी बापूराव जमादार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशूले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सतीश इंजामुरी, माता पालक संघाच्या सदस्या स्नेहा कुनी उपस्थित होते.
प्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते योगीराजेंद्र महास्वामीजी व वीरतपस्वी महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन, रंगमंच पूजन व फित कापून स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांनी अहवाल वाचनातून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला.विद्यार्थ्यांनी गणपती, भारतीय वेशभूषा, विदेशी वेशभूषा, तेलुगू रिमिक्स, शेतकरी नृत्य, हृदयी वसंत फुलताना, देशभक्तीपर तसेच विविध भाषेतील चित्रपटातील गाण्यांवर आधारित सुंदर नृत्य सादर केले. या स्नेहसंमेलनात नर्सरी ते आठवीपर्यंतच्या २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजेस्विनी जोगीपेठकर यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन कावेरी स्वामी यांनी केले. ज्योती ढगे यांनी आभार मानले.