अकलूज प्रतिनिधी
वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी अकलूज येथील ज्येष्ठ समाजसेवक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांची निवड झाली.
वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे यांनी ऑनलाइन सभेमध्ये ही निवड घोषित केली.
यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते सखाराम खोत, महासचिव अजय गाढवे, शिवाजीराव गावडे, यांच्यासह मान्यवर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.