पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी फुले,शाहू, आंबेडकर विचारमंच यांच्यावतीने 26 नोव्हेंबर 2023 भारतीय संविधान दिनानिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक,व पत्रकार यांचा सन्मान सोहळा समारंभ मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रथम फुले,शाहू,आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव प्राचार्य बी.पी रोंगे सर, पंढरपूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याध्यापक संघ महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाषराव माने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक सिकंदर ढवळे, भालचंद्र कांबळे, सुनील वाघमारे,जितेंद्र बनसोडे,कीर्तीपाल सर्वगोड आदी मान्यवर व पंढरपूर तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षक विद्यार्थी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजू खरे यांनी आपल्या भाषणात चळवळीतील अनेक घडामोडींचे विचार मांडले गेले