पंढरपूर प्रतिनिधी
सोमवार 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्री रामलल्लांच्या मूर्ती प्रतिष्ठापना होत असून हा सर्व देशवासियांसाठी आनंदाचा सण असून पंढरपूरकर सुध्या या आंदोत्सवात सहभागी होवून दिवाळी साजरी करणार आहेत. यानिमित्ताने ज्यांच्यामुळे हे मंदिर उभे राहिले त्या कारसेवकांचा सपत्नीक यथोचित सन्मान मनसे व विठ्ठल परिवाराच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.
सोमवारी सकाळी नऊ वाजता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री राम मूर्तीचे पूजन होणार असून या कार्यक्रमात कारसेवेत सहभागी झालेल्या सर्वांचा सन्मान केला जाणार आहे. यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. अयोध्येतील मंदिरात श्री राम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्याने हा दिवस दिवाळीसारखा सण साजरा केला जात असून या मंदिराची प्रतीक्षा सर्व भारतीयांना होती असे सांगताना धोत्रे म्हणाले की, मी 1991 विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो तेेंव्हापासून या दिवसाची वाट पाहिली आहे. ज्या कारसेवकांचे यासाठी मोठे योगदान आहे त्यांचा यथोचित सन्मान पंढरी नगरीत होत असून यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.