रोपळे प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील व माढा मतदार संघातील रोपळे या गावात, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार व रोपळे गावचे सुपुत्र राजू खरे यांचे रोपळे ग्रामस्थांकडून फटाक्याच्या आतषबाजी व हलगीच्या तालावर खरे यांची जंगी स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी निमित्त होतं ते फक्त रोपळे गावच्या क्रिकेट सामन्याचं, क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राजू खरे आले असता, तयारी मोहोळ विधानसभा मतदारसंघाची चर्चा मात्र माढा विधानसभेतील लोकांच्या तोंडून होत होती, खरे यांची इंट्री होताच रोपळे गावचे माजी सरपंच व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारीं साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांनी स्वागत करत सत्कार करण्यात आला.
त्यानंतर गावातील मुख्य चौकामध्ये असलेले भगव्या झेंड्याला पुष्पहार घालत माजी सरपंच व कल्याणराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांच्या कार्यालयास भेट देत आदरपूर्वक सन्मान करण्यात आला, यानंतर गावामध्ये मुख्य चौकातून राजू खरे यांची मिरवणूक काढत, गावातील मातंग समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ हे पार पडला.
यावेळी गावातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली यानंतर रोपळे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मैदानात ग्रँड एन्ट्री करण्यात आली, यावेळी क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करत राजू खरे यांनी आपल्या हातात बॅट घेत तुफान फटकेबाजी करत षटकारही लगावला, मात्र असाच षटकार मोहोळ विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये लगावणार असल्याचे देखील नागरिकांमधून बोलले जात होते, राजू खरे यांचं क्रिकेट क्रिकेट प्रेमींकडून आपल्या अंगात परिधान केलेल्या जर्सीच्या माध्यमातून दाखवून देण्यात आले, स्पर्धेची सुरुवात दोन्ही टीम्सना शुभेच्छा स्पर्धेला सुरुवात झाली यानंतर क्रिकेट प्रेमींकडून व रोपळे गावचे सुपुत्र व पुणे पिंपरी चिंचवडचे माजी भूमी अभिलेख अधिकारी शिवाजी भोसले यांच्या वतीने सत्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी रोपळे सह मान्य गावातील विविध पक्षाचे मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी राजू खरे यांच्या नावाची चर्चा आता मोहोळ तालुक्यासह आता पंढरपूरसह तालुक्यासह माढा मतदारसंघामधील गावामध्ये होताना दिसून येत आहे.