माढा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे जनसामान्यांच्या दळणवळणासाठी महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या महामंडळ लोकसेवेसाठी याची निर्मिती झाली .
परंतु हे महामंडळ सामान्यांच्या हितासाठी चालणारे ऐवजी अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी पद्धतीने हे महामंडळ चालतं याचा प्रत्यय अनेकांना अनेक वेळा आला त्यातलाच हा प्रकार तुमच्यासमोर आलाय. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ यांच्या माढा अनगर मार्गे मोहोळ या मार्गावर एसटीच्या फेऱ्या सतत सुरू असतात .
या प्रवासादरम्यान अनगर म्हणून काही प्रवासी व विद्यार्थी माढा येथे व्यवसायासाठी व शिक्षणासाठी येत असतात .माढा येथील जगदंबा सूतगिरणी परिसरामध्ये आर्या इंग्लिश मीडियम स्कूल .रयत शिक्षण संस्थेची शाळा .डी फार्मसी कॉलेज अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत इथे प्रवाशांची ये - जा असल्यामुळे बस स्टॉप उपलब्ध असताना बस थांबवली जात नाही.या संस्थेपासून माढा स्टॅन्ड जवळपास दीड किलोमीटर आहे .
याच मार्गावरून एसटी पुढे माढा स्टॅन्ड ला जात असल्यामुळे प्रवासी हे त्या बस स्टॉप वर उतरण्यासाठी कंडक्टरला विनंती करतात .तेव्हा अनेक कंडक्टरची या ठिकाणी अरेरावी चाललेली असते विद्यार्थ्यांना मुद्दामून एसटी न थांबवता गाडी एसटी स्टँडवर घेऊनन जाते .त्यामुळे विद्यार्थ्यांना हा त्रास होतो सूतगिरणी ते माढा स्टॅन्ड यादरम्यान विद्यार्थ्यांना चालत यावं लागतं . रस्त्याचा रस्त्यावरचा धोका वाढण्याची शक्यता आहे .
खरंतर अशा काळामध्ये एसटी थांबवणं गरजेचं असताना अध्ययन्त उद्धट वर्तन संबंधित एसटी वाहक करत आहेत .संबंधित स्टॅन्ड वरील कंट्रोलर व्यवस्थापक यांच्यासमोर ही गोष्ट आणल्यानंतरही तेे कंडक्टर ड्रायव्हरला सूचना न देता ते पाठीशी घालतात .ती खरच प्रवाशासाठी चालणारी एसटी आता आहे का .कर्मचाऱ्याची मस्तवालपणा आणिि पगार यासाठीच एसटीची निर्मिती झाली का ?
मात्रा ज्या मार्गावर वाहतुकीचा थांब आहे तिथेच एसटीत नांबवता विद्यार्थ्यांची विनाकारण अडचण करतात .संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊन .या थांब्यावर एसटीआय कंपल्सरी थांबण्याची व्यवस्था आगा र प्रमुख यांनी करावी अशी मागणी प्रवाशानकडून करण्यात आली आहे.