पंढरपूर प्रतिनिधी
मराठा सेवा संघ व डॉ .पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने देण्यात येणारा महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार पंढरपूर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष व पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथील श्री रेणूका विद्यालयाचे शिक्षक गणेश कालिदास लटके यांना प्रदान करण्यात आला.
पंढरपूर येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, तात्यासो पाटील, बाळासाहेब काळे ,प्रशांत पाटील, गट शिक्षणाधिकारी मारूती लिगाडे, सुनिल चव्हाण, तात्यासो यादव, पांडुरंग गायकवाड, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, ह.जा.भोसले यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते शिक्षक गणेश लटके यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गणेश लटके यांनी गेल्या २० वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष उपक्रम राबवले आहेत. तर विज्ञान मंडळाच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबाबत जागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून हा गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षक गणेश लटके यांचे शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन समाधान घाडगे, विज्ञान मंडळाचे लक्ष्मीप्रसाद मोहिते, राजेंद्र आसबे, सचिव ऍड . विजय चव्हाण, प्रचार्या राखी गाभुड, शिक्षक वर्ग, ग्रमपंचायत पदाधिकारी, ग्रमस्थ यांनी अभिनंदन केले.
पुरस्कारामुळे कर्तव्याची जबाबदारी वाढली...
शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी प्रधान्य दिले पाहीजे. त्यासाठी विविध उपक्रमांचे नितांत गरज असते. नेमक्या याच कार्याची दखल घेवून मराठा सेवा संघ व डॉ .पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे कर्तव्याची जबाबदारी वाढली आहे.
गणेश लटके
पुरस्कार प्राप्त, शिक्षक , पंढरपूर