पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ संचालित उमा महाविद्यालय पंढरपूर जिल्हा सोलापूरचे महाविद्यालय स्थापनपासून कार्यरत असणारे शशिकांत रघुनाथ दुनाखे सर गुरुवार दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी कार्यालयीन अधिक्षक पदावरून नियत वयोमानानुसार पस्तीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले.
संस्थेचे विश्वस्थ युवानेते प्रणव परिचारक यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी युवानेते प्रणव परिचारक यांनी दुनाखे सरांनी केलेल्या सेवेबद्दल गौरव उद्गार काढले.
यावेळी मा. प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे कार्यवाह डॉ. मिलिंद परिचारक यांनी देखिल दुनाखे सरांना भावी आयुष्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या.