पंढरपूर प्रतिनिधी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उपनेत्या तथा महीला आघाडी जिल्हा प्रमुख अस्मिताताई गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली “ सुसंवाद बैठक “ पंढरपूर येथील रेस्ट हाऊस येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सर्व अंगीकृत संघटनाचे सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे महिला आघाडी जिल्हा संघटिका पुनम अभंगराव युवा सेना राज्य सहसचिव स्वप्नील वाघमारे , तालुकाप्रमुख रवी मुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अस्मिता गायकवाड यांना शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी जमलेल्या पदाधिकारी यांचा स्वागत आणि सत्कार स्वीकारला भाजप सरकार बद्दल महाराष्ट्र राज्यात प्रचंड असंतोष पसरलेला असून राज्यात महिला, शेतकरी, बेरोजगार युवक, कामगार आदी सर्व जनतेचे प्रश्न अनुत्तरीत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आव्हान शिवसेना उपनेत्या अस्मिता ताई गायकवाड यांनी पंढरपूर येथे केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी. तीस वर्षाच्या कारकिर्दीत खडतर प्रवास करून उपनेता हे पद कार्याचे कौतुक निष्ठेचे कौतुक म्हणून अस्मिता ताई गायकवाड यांना पक्षप्रमुखांनी बहाल केले आहे त्यांची निवड सार्थ आहे. पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त केला.
शिवसेना राज्य सहसचिव स्वप्निल वाघमारे यांनी अस्मिता ताई या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला दागिना असून , अस्मिताताईशीआपले ऋणानुबंध वर्षानुवर्षाच्या आहेत त्यामुळे सर्वजण आपल्या सोबत आहे. असा विश्वास देत भगव्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूनम अभंगराव यांनीही आनंद व्यक्त करून. महिलांना ताईंच्या रुपाने हक्काचं व्यासपीठ मिळाल्याचे सांगून उपनेत्या अस्मिताताईं यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळीमहिला आघाडी तालुका संघटिका संगीता पवार शहराध्यक्ष पूर्वा पांढरे, महिला आघाडी शहर उपप्रमुख शरीफा पठाण, महिला आघाडी उपशहर प्रमुख रेहाना अतार, महिला आघाडी पंढरपूर मंगळवेढा समन्वयक मंजुळा धोडमिशे, महिला आघाडी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष अनिता कसबे, महिला आघाडी तालुका उपप्रमुख राबिया शेख, पंढरपूर महिला आघाडी शहर उपप्रमुख अनिता पटाईत, युवासेना उपजिल्हाप्रमुख आकाश माने, तालुका उपप्रमुख विलास चव्हाण, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश भैय्या चव्हाण, शहर प्रमुख रवींद्र मुळे, पंढरपूर विभाग प्रमुख पवन घोडके, युवा सेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर युवा सेना उपप्रमुख अमोल घोडके, पंढरपूर तालुका सोशल मीडिया समन्वयक ऋषिकेश कवडे, करडी शाखाप्रमुख अनिल कांबळे, रोपळे विभाग प्रमुख बाळासाहेब पवार, बाबळगाव शाखाप्रमुख नामदेव चव्हाण, भाळवणी गटप्रमुख सुधाकर माळी, विधानसभा शिवदूत (पंढरपूर मंगळवेढा), माझी उपशहर प्रमुख बाळासाहेब देवकर, त्याचप्रमाणे विशाल डोंगरे, रंजीत बागल, ज्योतीराम काळे, संजय पवार, सुनील चेळेकर आदि शिवप्रेमी उपस्थित होते.