पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर नगर परिषदेच्या प्रशासनाने वाढीव करवाड केल्या कारणाने पंढरीतील नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पंढरपूरकरांची चिंता दूर करण्याकरिता सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी व मित्रपक्ष यांच्या वतीने करवाढ माफ करण्याबाबत अर्ज अभियान सुरू केले आहे.
पंढरीत गेल्या अनेक महिन्यापासून नगरपालिका प्रशासकीय राजवट सुरू आहे प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे अनेक चटके पंढरपूरकरांना बसत असून कोरनाने आर्थिक संकटात सापडलेल्या पंढरपूरकरांना पंढरपूरच्या नगरपालिकेच्या प्रशासनाने करवाढीचा जुलमी झटका दिलेला आहे याकरवाडी पूर्वी प्रशासनाने लोकप्रतिनिधी अथवा शासनाशी चर्चा करून अनुमती घेतली आहे का असा प्रश्न पंढरीतील सुज्ञ नागरिकांना पडला आहे तर करवाढीच्या आर्थिक बोजाणे चिंतेत पडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी व ही कर वाढ रद्द करण्यासाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, किसान काँग्रेस व मित्रपक्ष यांच्या वतीने पंढरीतील 34 वार्डात घरोघरी जाऊन काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी पंढरीच्या नागरिकांकडून अर्ज भरून घेऊन ही जुलमीकरवाढ रद्द करण्यास नगरपालिका प्रशासनास भाग पाडणार आहे
या अभियानाचा शुभारंभ शनिवार दिनांक 9 /12 /2023 रोजी मटण मार्केट व हनुमान मैदान येथे अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नागेश गंगेकर व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव शंकर सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी समाजसेवक अरुण भाऊ कोळी होते
कार्यक्रमास सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी माजी अध्यक्ष समीर कोळी किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल कौलगे पाटील सोलापूर जिल्हा सरचिटणीस राजू उराडे पंढरपूर मंगळवेढा युवक विधानसभा अध्यक्ष बलदेव शिकलकर राष्ट्रवादीचे सरचिटणीस रशीद शेख सोशल मीडिया तालुकाध्यक्ष बाळासाहेब आसबे सेवादल अध्यक्ष गणेश माने शहर उपाध्यक्ष सागर कदम शशिकांत चंदनशिवे,पोपट परचंडे , दिलशाद रफिक नाडीवाले, बुडन करमाळकर अबू रियाज राशन कर संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शकील रतनपारखे व काँग्रेस कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.