करवाढ रद्द करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन पालिकेला सदर
सुविधांचा अभाव;नागरिकांनी कर भरू नये ; दिलीप धोत्रे
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर नगरपालिकेने मालमत्ता करावर भरमसाठ वाढ केल्याने सोमवारी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसे आणि विठ्ठल परिवार यांच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा निघाला पुढे चौफाळा येथून थेट नगरपालिकेवर धडकला.
मोर्चामध्ये पंढरपूर शहरातील पदाधिकारी,पंढरपूरकर नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी पंढरपूर शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी दिले जात नाही.
प्रधान आवास योजनेतील हक्काची घरे मिळत नाहीत. झोपडपट्टीत गेले अनेक वर्ष राहणाऱ्या नागरिकांना सातबारा उतारा दिला गेला नाही, बंद अवस्थेतील बोरवेल. यासह शहरातील बंद अवस्थेतील उद्याने, पालिकेचे बंद अवस्थेतील दवाखाने, शहरातील रस्त्याची दुरावस्था, स्मशानभूमीची दुरावस्था, नगरपालिका शाळांचे इमारती मोडकळीस आले आहेत. तरी सुद्धा नगरपालिकेकडून नागरिकांवर जुलमी करवाढ केली आहे. नगरपालिकेने चुकीच्या खाजगी एजन्सीला सर्वेक्षणाचे टेंडर देऊन खोटे सर्वेक्षण करून घेतले आहे .यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असून संबंधित एजन्सीवर कारवाई करून नगरपालिकेचे दीड कोटी रुपये वसूल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
यामुळे नागरिकांनी कोणताही कर भरू नये कर वसुलीसाठी कोण कर्मचारी आल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मनसेनेते दिलीप धोत्रे यांनी केले.
यावेळी त्यांनी अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या नेतेमंडळींचा चांगला समाचार घेतला.
याबाबत जुलमी करवाढ बाबत लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची भेट घेणार असून त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन कर वाढ रद्द करण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले. जर करवाड रद्द नाही झाली तर पंढरपूर शहरातील एकही नागरिक कसल्याही प्रकारचा कर भरणार नाही असे दिलीप धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण राज घाडगे, नगरसेवक लखन चौगुले, नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक नानासाहेब कदम, नगरसेवक शिवाजी मस्के, नगरसेवक मोहम्मद उस्ताद, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले, नगरसेवक नागेश यादव, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर,उपजिल्हा अध्यक्ष महेंद्र पवार, बालाजी पवार, सागर घोडके. इत्यादि उपस्थित होते.