पंढरपूर प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आ.रामदासभाई कदम आ.भरतशेठ गोगावले,मंत्री दादासाहेब भुसे, आ. संदिपान भुमरे,खा.युवा नेते श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात शिवदूत स्नेह मेळावा राबविण्यात येत असून अश्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ विधानसभा मतदार संघातील उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये शिवसेना नेते राजू खरे यांच्या पुढाकार्याने मार्डी या गावात शिवसेना मनामनात शिवसेना घराघरात संकल्पना राबवत या शिवदूत मेळावामध्ये दिवाळीनिमित्त जो उपहार पाठवण्यात आला होता तो राजू खरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी शेकडो शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी भावी आमदार म्हणून राजू खरे यांचे जंगी स्वागत करत गावातील मुख्य चौकातून रॅलीही काढण्यात आली.
यावेळी खरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कश्याप्रकारे सामान्यातून सामान्य जनतेची व कार्यकर्त्याची कामे करत असल्याचे जनतेपुढे मांडण्यात आले तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरे वारसदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले तसेच येणाऱ्या काळात संघटना बांधणीवर शिंदे सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत माहिती पोचवावी यासाठी मुख्य उद्देश असून संघटना जेवढी मजबूत,तेवढीच आपली ताकद येणाऱ्या निवडणुकांत वाढेल म्हणून सर्वांनी आतापासूनच कामाला लागन्याचे देखील आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी मोहोळ विधानसभेचे अध्यक्ष प्रकाश पारवे, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर गोरे, उपतालुकाप्रमुख उमाकांत करंडे, युवासेना तालुका प्रमुख आकाश गजघाटे, शिवसेना जिल्हा सचिव जावेद भाई पटेल, शिवसेना विभाग प्रमुख सरपंच लक्ष्मण राठोड, वाहतूक सेना तालुका प्रमुख विजय गरड, बजरंग देवकर, अशपाक शेख, विलास वाघमारे, नंदु गवळी, योगेश जानराव, मुकुंद जांभळे,अतुल सावंत, विशाल गवळी, किरण गजघाटे, अनिकेत गजघाटे, अनिल जाधव, रंगनाथ गुरव, कुणाल गायकवाड, राजकुमार गजघाटे व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.