सोलापूर प्रतिनिधी
सिंहगड पब्लिक स्कूल केगाव, सोलापूर मध्ये दि. ०२.१२.२०२३ रोजी क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर पोलीस उपायुक्त श्री. विजय कबाडे साहेब उपस्थित होते त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व मैदानाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले, सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्रशासकीय अधिकारी श्री. दत्तात्रय नवले, प्राचार्या सौ. निखहत शेख व उपप्राचार्य श्री. प्रकाश नवले तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सुरुवातीला क्रीडा ध्वजारोहण करून शाळेच्या पथकाने लयबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने परेड करून क्रीडा ध्वजाला सलामी दिली. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे श्री.विजय कबाडे साहेब यांनी शालेय जीवनात तसेच भावी आयुष्यात क्रीडा बरोबरच शिस्तीचे महत्व सांगितले तसेच खेळ भावना जपण्याचे व वर्षभर विविध स्पर्धामध्ये सहभागी होऊन आपल्या शाळेचे व राज्याचे नाव लौकिक करण्याचे आवाहन केले. तसेच सिंहगड संस्था ही मुलांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देणारी नाव लौकिक संस्था आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सिंहगड संस्थेने एक चांगले व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. शेवटी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून व जे हरले त्यांनी जिंकण्यासाठी सराव करावा, असे आवाहन त्यांनी केले.
क्रीडा सप्ताहामध्ये ४X१०० मी. रिले 200 मी धावणे, १०० मी धावणे, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, थ्रोबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच उपस्थित असलेल्या सर्व पालक व शिक्षकांसाठी विविध क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या सर्व पाहुण्यांचे प्राचार्या सौ. निखहत शेख यांनी आभार मानले. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रशांत जाधव, सीमा मादगुंडी व अजित कट्टे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियांका गोरे व वसिम इनामदार यांनी केले. हा क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.