पंढरपूर प्रतिनिधी
शासन निर्देशानुसार व महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार पंढरपूर नगरपरिषद मार्फत सन २०२३-२४ ते २०२६-२७ या कालावधीकरिता सुरू असलेल्या चतुर्थ वार्षिक कर पुर्नमुल्यांकन प्रक्रिया राबविण्यात येत आहे पंढरपूर नगर परिषदेचे
मालमत्ता कर हा अतिशय महत्वाचा उत्पन्नाचा स्त्रोत असून या उत्पन्नातूनच नागरिकांना सर्व सेवा सुविधा पुरविला जातात. पंढरपूर नगरपरिषदेने सन २०१८ -१९ या अर्थिक वर्षामध्ये मागील कर मुल्यांकन केले होते. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार व शासन निर्देशा नुसार दर चार वर्षानी कर मुल्यांकन करणे नगरपरिषदेला बंधनकारक आहे त्यानुसार सन २०२२-२०२३ पासून नविन कर मुल्यांकन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे व त्याप्रमाणे सन २०२३ -२०२४ ते २०२६-२०२७ या वर्षाकरिता कर मुल्यांकन करणेची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय क्रमांक २०२२/ ५९३३ दिनांक २७/१२/२०२२ च्या परिपत्रका नुसार शासनाकडून सन २०२३-२०२४ १५ वा वित्तआयोग अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी मालमत्ता कर प्रणाली मध्ये सुधारणा करणे व त्यानुसार नगरपरिषदेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढून उत्पन्नात वाढ करणे ही प्रमुख अट यामध्ये निर्धारित करण्यात आली आहे. तसेच सन २०२२-२०२३ मधील उत्पन्नात अपेक्षित वाढ न झाल्यास सन २०२३-२०२४ मध्ये १५ वा वित्त आयोग अनुदानासाठी संबधित नागरीस्वराज्य संस्था अपात्र ठरू शकते. त्यामुळे वाढती लोकसंख्या, शहराचे वाढते शहरीकरण, मालमत्ताधील बदल, नविन बांधकाम, मालमत्ता वापरामधील बदल, नविन ले आऊट यांचे कर मुल्यांकन करून नगरपरिषदेच्या मालमत्ता करामध्ये सुधारणा करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यानुसार शहरातील सर्व मालमत्तांची सर्वेक्षण करून नोंदणी करण्यात आलेली आहे यापूर्वी पंढरपूर शहरांमध्ये सुमारे २०९४४ मालमत्ता होत्या आता सर्वेक्षण करत असताना जवळजवळ २७ हजार ४३३ मालमत्ता चे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे त्यानुसार ६४८९ मालमत्तांची शहरांमध्ये वाढ झालेली दिसून येते, सदर मालमत्तांना कराची आकारणी करताना सहाय्यक संचालक नगरचना सोलापूर यांना कर निर्धारित करण्याचे अधिकार आहेत. नियमातील तरतुदीनुसार शहराचे ८ झोन ४२ वॉर्ड पाडण्यात आले असून मालमत्ता, त्यातील बांधकाम कोणत्या स्वरूपाचा आहे उदाहरणार्थ पत्रा, काँक्रीट, गरडेल फरशी, मातीचे घर, झोपडी यांचे स्वरूप, बांधकामाची वर्ष ,असलेले बांधकाम मुख्य रस्त्यावर आहे का आतील बाजूच्या रस्त्यावर आहे त्यानुसार त्या दराची कर आकारणी केली जाते तसेच त्या जागेत व्यवसाय अगर घर असल्यास त्याची नोंद घेऊन कर आकारणी केली जाते त्यामुळे सरासरी संकलित करावर दहा टक्के वाढ झालेली दिसून येते, वास्तविक पाहता यापूर्वी १९०० रुपये पाणीपट्टी होती. सन २०२२ मध्येच २३७५ अशी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही कर पुनर्मूल्यांकन करत असताना कोणतीही वाढीव पाणीपट्टीची वाढ करण्यात आलेली नाही नागरिकांवर करांची अवाजवी वाढ होणार नाही याची दक्षता नगरपरिषदेने घेतली आहे.
तरीही पुनर्मूल्यांकन करत असताना एखाद्या मालमत्तेच्या कर आकरणीबाबत अवाजवी किंवा चुकीची वाढ असल्याचे दिसून आल्यास त्याबाबत योग्य त्या कागदपत्रा सह पुराव्यानिशी दिनांक १२/१२/२०२३ पूर्वी कर विभाग, नगरपरिषद यांचे कडे लेखी आक्षेप / हरकत हरकती नोंदवाव्यात म्हणून महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम ११९ अन्वये सर्व मालमत्ताधारकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत २३५ मालमत्ताधारकाने हरकती नोंदवलेले आहेत आलेल्या हरकतीवर मा. सहाय्यक संचालक नगर रचना सोलापूर हे स्वतः किंवा आपल्या प्रतिनिधीमार्फत यावर सुनावणी घेऊन आलेल्या अर्जांची पडताळणी करून योग्य ती नियमानुसार कर आकारणी करणार आहेत तरी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने सर्व नागरिकांना व मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात येत आहे की आपली कर आकरणी बाबत काही तक्रार अथवा हरकत असल्यास त्वरित आपण नगर परिषदेकडे संपर्क साधावा जेणेकरून नगरपरिषदेस सदर मिळकती बाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून योग्य ती दुरूस्ती करता येणे शक्य होईल असे आवाहन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी केले आहे.