मुखबधिरांसाठी बनवले नाविन्यपूर्ण ऍप्लिकेशन
सोलापूर प्रतिनिधी
इंटेली स्विफ्ट पुणे या नामवंत कंपनी मार्फत आयोजित हॅकॅथॉन स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव च्या विद्यार्थ्यांनी ५०हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक पटकावले.
या संघात स्वप्नील मेरगु, राहुल बासुतकर,युवराज मादास, प्रथमेश यादव, आराफत नदाफ या विद्यार्थ्यांच्या संघाने हे यश मिळवले.
मूकबधिर लोक हातवाऱ्यांचा वापर करून त्यांच्या भावना व्यक्त करतात. लोकांना त्यांना काय सांगायचे आहे हे समजून घेण्यासाठी सांकेतिक भाषा शिकणे आवश्यक आहे. म्हणून अशा ऍप्लिकेशनची आवश्यकता आहे जे चिन्ह ओळखेल आणि त्याचे अक्षरांमध्ये रूपांतर करेल, जे वापरकर्त्यांना कार्यक्षमतेने सांकेतिक भाषा शिकण्यास मदत करेल.मशीन लर्निंग आणि इमेज प्रोसेसिंग अल्गोरिदमच्या मदतीने विद्यार्थ्यांनी टेन्सरफ्लो मॉडेल तयार केले आहे, जे मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये एकत्रित केले आहे. हे मोबाइल अॅप्लिकेशन हात वाऱ्यांच्या खुणा कॅप्चर करते आणि चिन्हाच्या संकेतानुसार संबंधित वर्णमालेचा अंदाज लावते. हे ऍप्लिकेशन वापरकर्त्याला सांकेतिक भाषा कार्यक्षमतेने शिकण्यास आणि समजण्यास मदत करते.
या हॅकॅथॉन मध्ये एकूण ९० संघ सहभागी झाले होते त्यातुन सर्वोत्तम ५ संघ निवडले व या पाच संघांत अंतिम फेरी घेण्यात आली. या अंतिम फेरीत सिंहगड अभियांत्रिकी च्या संघाला उपविजेतेपद मिळाले.रोख रु.५० हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
सदर प्रकल्प बनवण्यासाठी प्रा.शैलजा शेळके व प्रा. सुरज धनवे यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सहसचिव श्री. संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, सीआरटीडी चे डायरेक्टर व ज्येष्ठ संशोधक डॉ. एस. एच. पवार , उपप्राचार्य डॉ. एस.एम जगदे व डॉ. आर. टी. व्यवहारे, सिंहगड पब्लिक स्कुल च्या प्राचार्या निखत शेख,विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय गंधमल यांनी अभिनंदन केले.