मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा पोलीस ठाणे मध्ये मंगळसुत्र चोरीस गेलेले दाखल गुन्हयातील महिला आरोपीना अटक करून त्यांच्याकडुन १८ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र सुमारे १,००,०००/- रूपये किमतीचे मंगळसुत्र जप्त करून गुन्हा उघडकीस दिनांक. २५/१२/२०२३ रोजी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दित मंगळसुत्र चोरी झाली होती. यातील घटनेमध्ये यातील फिर्यादी वैशाली बिरूदेव लवटे वय २८ वर्षे रा. नंदेश्वर ता. मंगळवेढा हि मंगळवेढा येथील रचना मॅचिंग सेंटर किल्ला भाग, मंगळवेढा येथे कपडे खरेदी करणेकरीता फिर्यादी व फिर्यादी यांची ननंद पती, सासु व लहाण मुलगा असे खरेदी करीत दुकानात गेले असता तेथे फिर्यादीच्या लहाण मुलाने फिर्यादीच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र रडताना तोडले असल्याने फिर्यादी यांनी सदर सोन्याचे मंगळसुत्र घाईमध्ये दुकानातील काउंटरवरती ठेवलेले होते. सदर काउंटरवर फिर्यादीने ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र अनोळखी दोन महिलांनी फिर्यादीची नजर चुकवुन चोरून घेवुन गेल्याबाबत मंगळवेढा पोलीस ठाणेत फिर्याद दाखल केली होती.
मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दित झालेली मंगळसुत्र चोरी उघडकीस आणने पोलीसांना आवश्यक होते. मा. पोलीस निरीक्षक रणजीत माने साो, यांच्या मार्गदर्शनाखाली पोना /९२६ कृष्णा जाधव यांनी सदर प्रकरणात सखोल तपास करून तांत्रीक पुराव्याचा आधार घेवुन यातील आरोपी नामे
१) उज्वला जयवंत काळे वय ३१ वर्षे
२) वैशाली जनार्धन काळे वय २५ वर्षे दोघी रा. खडकी. ता. मंगळवेढा
यास गोपनीय बातमीदारा मार्फत व तांत्रीक पुराव्याच्या आधारे त्यास दिनांक २६/१२/२०२३ रोजी खडकी येथुन अटक करून त्याची अटकपूर्व वैदयकीय तपासणी करून आरोपीस मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो, कोर्ट मंगळवेढा यांचे समक्ष हजर करून त्याची ३ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्याच्याकडुन सुमारे १,००,०००/- रूपये किमतीचा सोन्याचे मंगळसुत्र आरोपीनी निवेदन पंचनाम्या प्रमाणे काढुन दिला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे साो, सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर साो, सोलापुर ग्रामीण, यांचे मार्गदर्शनाखाली मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, मा.विकांत गायकवाड सो, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग, मा. अमोल भारती सो, पोलीस निरीक्षक रणजीत माने मंगळवेढा पोलीस ठाणे सोबत पोसई पुरुषोत्तम थापटे, पोहेकॉ/१२५५ विठ्ठल विभुते, पोहेकॉ/९०५ महेश कोळी, पोहेकॉ/१४६१ प्रमोद मोर, पोहेकॉ/३५८ सुनिल गायकवाड, मपोहेकॉ/१८७८ सुनिता चवरे, मपोहेकॉ वंदना घोडके, पोना/९२६ कृष्णा जाधव, पोका/४६१ अमोल राउत, पोकॉ/७६३ खंडाप्पा हत्ताळे, पोकॉ/ युवराज वाघमारे यांनी कारवाई केली आहे.
पुढील तपास पोना /९२६ कृष्णा जाधव नेम, मंगळवेढा पोलीस ठाणे हे करत आहेत.