पंढरपूर प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक मा.श्री.राजु खरे साहेब मौजे.नरखेड ता.मोहोळ येथे इंग्लिश स्कूल व शिवतेज प्राथमिक शाळा नरखेड येथे कार्यक्रमामध्ये आले आले असता.मोहोळ तालुका उपप्रमुख समाधान खंदारे यांनी मा.राजु खरे यांना शिवसैनिक कै.सिध्देश्वर वरपे यांचे आकस्मिक निधन झाल्याचे सांगताच.मा.राजु खरे यांनी तात्काळ सदर कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली तसेच कै.सिध्देश्वर वरपे यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे व त्यांच्या पत्नी बालिका सिध्देश्वर वरपे यांना मोल-मजुरी करून आपल्या कुटुंब सांभाळत आहेत हे कळताच तात्काळ त्यांना ५०,००० रू.अर्थिक मदत केली.
तसेच त्यांच्या मुलीला ८२% मार्क मिळाले पण शिकण्याची इच्छा असुनही अर्थिक अडचणी येतात हे कळल्यावर मा.राजु खरे यांनी तात्काळ मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च व कुटुंबाला आर्थिक मदत देऊन सदर कुटुंबाच्या पाठिशी खंबीर पणे उभा राहु मोठा आधार दिला.
यावेळी पुतण्या मा.तानाजी वरपे, सोमनाथ गोरे,मा.दतात्रय राऊत,मा.यशवंत चव्हाण,मा.सिध्देवर मंडले,मा.प्रमोद शिंदे,पै.बाळासाहेब चवरे,सेवालाल नगर सरपंच मा.लक्ष्मण राठोड,उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख मा.उमाकांत करंडे, उत्तर सोलापूर युवा सेना तालुका प्रमुख मा.आकाश गजघाटे, युवा नेते मा.गणेश जाधव,मा.चंदनशिवे सर,मा.समाधान बाबर अदि कार्यकर्ते उपस्थित होते.