आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यात जनतेच्या आरोग्याशी जिवघेणा खेळ सुरूच
सोलापूर प्रतिनिधी
राज्याच्या आरोग्य मंत्र्याच्या सोलापूर जिल्हयास, शहरातील रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस (वैद्यकीय प्रमाणपत्र व व्यवसाय परवाना ) नसलेल्या बोगस डॉक्टर वर सोलापूर महानगर पालिका आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसताना सोलापूर शहरात अनेक भागात वैद्यकीय डिग्री नसलेले अनेक बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत आहेत.
अश्या बोगस डॉक्टरमुळे सोलापूर शहरातील रुग्णाचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच अश्या वैद्यकीय व्यवसायाचा परवाना व डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे परंतु सोलापूर महानगर पालिका आरोग्य विभागाकडून फारसे कारवाई चे पाऊल उचलले जात नाही
*शहरात अनेक बोगस डॉक्टर असताना कारवाई मात्र एका वर्षात फक्त 0 3 बोगस डॉक्टरवर*
सोलापूर शहरातील बोगस डॉक्टरवर महापालिका आरोग्य विभागाकडून केलेल्या कारवाई बाबत साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये सोलापूर महानगर पालिका आरोग्य विभाग यांच्या कडे माहिती मागवली होती सोलापूर शहरात फक्त 03 बोगस डॉक्टरवर कारवाई केल्याची माहिती दिली आहे.
शहरीभागातील गोरगरिबांना तज्ज्ञ डॉक्टरांची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी कमी असल्याने शहरी भागातील गरीब रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात.
हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णानां देखील कळत नाही तसेच रुग्ण देखील डॉक्टर च्या शैक्षणिक पात्रता विषयी अधिक चौकशी करत नाहीत.
सोलापूर महानगर पालिका आरोग्य विभागाकडून शहरातील प्रत्येक डॉक्टरकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे सोलापूर शहरात बोगस डॉक्टर उघडपणे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत सोलापूर शहरात बोगस डॉक्टरांची मोठी डोकेदुखी वर्षानुवर्षे कायम बोगस डॉक्टर मुक्त शहर करण्यासाठी सोलापूर महाननगर पालिका आरोग्य विभागाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. सोलापूर शहरातील बोगस डॉक्टर वर आरोग्य विभाग काय कारवाई करणार? याकडे शहरातील सुजाण नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.