कराड प्रतिनिधी
कराड येथे श्री संत नामदेव मंदिर शिंपी समाज बांधव कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या 2/3 मार्च रोजी होणाऱ्या "पंजाब घुमान" येथे महामेळावा व अखिल भारतीय क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य , तसेचसातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी होणाऱ्या मेळाव्या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नाना पाथरकर राष्ट्रीय अध्यक्ष ,सातारा जिल्हा शिंपी समाजाचे अध्यक्ष संजय हिरवे , महादेव खटावकर , संतोष मुळे , भिकाजी गणबावले आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घुमान मध्ये अनेक वेळेला जाऊन आलेले ,श्री कराड व मसूर येथील कारंजकर डॉक्टर,अध्यक्ष अतुल बारटक्के, सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व सहकारीव अनेक राष्ट्रीय सदस्य कराड मधील सर्व समाज बांधव नामदेव मंदिराची ट्रस्टी व अध्यक्ष महिला व कार्यकर्ते उपस्थितीत होते.
घुमानाला जाणे विषयी सर्वांना आवाहन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त समाजबांधव येथील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली